कर्जत जामखेड विधानसभा : शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज २८ रोजी दाखल केला. त्यानंतर त्यांनी सभा घेतली. या सभेत रोहित पवार काय म्हणाले? वाचा A टू Z मुद्दे
राम शिंदे यांनी सहा महिने प्राध्यापक म्हणून काम केलं..अजून काही काळ त्यांनी काम केलं असतं तर लहान मुलांच्यात भविष्याचं काय झालं असतं,
एका गावात गेलो तिथे बोलताना विचारलं गावात माझे विरोधक आले होते का तर तिथे लहान मुलगा उठला आणि म्हणाला दादा तुमचे नाही आमच्या सगळ्यांचे विरोधक आले होते.
एक मुलगा म्हणाला आमच्या हिताचे काही बोलले नाही त्यांनी तुमच्यावर टीका केली..
तिसरा मुलगा उठला म्हणाला.. त्यांनी मोकळ्या कंपासी दिल्याची टीका केली.. त्यावर एक मुलगी म्हणाली दादांनी मोकळी कंपास दिलीय, तुम्ही खोडरबर किंवा शिशीपेन्सील द्या आम्हाला.. असं उत्तर दिल्याचं मुलगी म्हणाली..
लहान मुलं म्हणलं त्यांनी सायकलीवर टीका केली, त्यावर दादा तुम्ही सायकली दिल्यात त्यांनी चार गावात मिळून एखादं पंक्चर दुकान काढावं.. असं उत्तर मला लहान मुलांनी दिलं
रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो..
सोन्याच्या चमच्याचा वापर करून जनतेला मदत केली.. सरकार कमी पडलं तिथं आम्ही सरकार बनलो..
दुष्काळ पडला तेव्हा सरकारने 60 70 टँकर दिले , टँकर वाढवा अशी आमची मागणी होती, पण मान्य केली नाही.. मग मी 300 टँकर सुरु केले..
विरोधकांनो लाईनीत शिस्तीत रहावा.. आमच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर याद राखा.. रस्त्याच्या आसपास वेड्या बाभळी असतात… त्यांना एकच सांगतो.. वेड्या बाभळींनी शांत रहावं.. जर जास्त रस्त्यावर वेड्या बाभळी आल्या तर आम्हाला जेसीबी लावावा लागेल..
स्वराज्य ध्वजाला दांडकं म्हणाले..आता २५ दिवस राहिलेत.. लोकशाहीच्या माध्यमांतून आम्ही असं दांडकं.. तुमच्या…. लावू
राशिन कर्जत व जामखेड ला स्टेडियम बांधणार..
मी रोहित शर्माला आणलं.. पण तुमच्या वाढदिवसाला स्टेजवर कोणाला आणलं होतं..
२०१९ ला भूमिपुत्राचा विषय आला होतो, तेव्हाच लोकांनी तो विषय संपवलेला आहे..
तुमच्या हिमंत असेल तर नरेंद्र मोदींना विचारा तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये कसे लढता..
Midc बंद पाडली.. २५ दिवस थांबायचयं.. त्यानंतर आपणच त्यावर सही करू आणि midc मंजुर करू..
मतदारसंघातील गुंडागर्दी काढण्यासाठी मी पाच वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले..
मंत्री नसताना मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदारसंघात आणला..
गेल्या दीड वर्षांत कोण गुंडागर्दी वाढवतयं हे दिसतयं
मतदारसंघात दोन पोलिस स्टेशन ची मागणी होती.. क्राईम रेट वाढवा असे विरोधक बोलायचे.. पण मी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिस स्टेशन मंजुर करून आणले..
कुसडगावला Srpf मी आणले – तिथं आम्हाला आडवलं.. पण मी पोलिसांना सांगतो.. आम्ही आत पण गेलो असतो. गोळ्या घाला आम्ही नाही घाबरत.. आत जर आलो असतो ना तिथे असणाऱ्या सगळ्या पोलिसांच्या नोकर्या गेल्या असत्या.. तुमचा विचार केला म्हणून आम्ही शांत बसलो..
गेल्या दीड वर्षांपासून मतदारसंघात गुंडागर्दी डोकं वर काढतेय.. मी तुम्हाला शब्द देतो.. त्या राखीची शपथ घेतो.. पुढच्या पाच वर्षांत मतदारसंघ गुंडामुक्त करणार.. अवैध दारूवर बंदी आणणार..
महाविकास आघाडी सरकार आल्यावर लाडकी बहिण योजना आपलं सरकार बंद करणार नाही.. पण या योजनेचं नाव बदलणार.. लाडक्या बहिणींच्या मुलांना नौकरी देणार तसेच.. २५ ते ३० हजाराचा पगार कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत..
महाविकास सरकार आल्यावर शेतीमालाला हमीभाव देणार…
प्रचारासाठी राज्यात फिरावं लागेल.. प्रचारासाठी राज्यात जाऊ का ? तुमच्या परवानगी मी बाहेर प्रचाराला जाणार.. बुथची जबाबदारी व्यवस्थित सांभाळा.. एक लाख मताने निवडून देणार का ?
विरोधक गावात येतील धमक्या देतील.. बरचं काही करतील..पण घाबरू नका..
काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांना शब्द देतो की पुढच्या पाच वर्षांत तुम्हाला तक्रार करायची संधी देणार नाही.. लहान मोठ्या निवडणुकीत मित्रपक्षांना मान सन्मान देईन..
कार्यकर्त्यांना तक्रार करता येईल असे मी पुढच्या पाच वर्षांत वागणार नाही..
राजकारणात मी नवीन आहे, नक्कीच मी कुठेतरी कमी पडलो असेल..
सरकार आपलं येतयं, त्यामुळे जो आपल्याबरोबर अत्ता तोच आपला.. जो आपल्या बरोबर नाही तो आपला नाही..
गावात वॉर्डात जे काही करायचं असेल ते पुढील पाच वर्षांत बुथप्रमुखांना विचारल्याशिवाय करणार नाही..
जर कुठली नाराजगी असेल तर कृपा करून विसरून जावा..
मी माझा स्वभाव बदलला नाही.. मी माझे कपडे बदलले नाही.. केस पिकलेले कलर करत नाही.. कन्सल्टंटचं मुळीच ऐकून घेत नाही
माझ्यात काही बदल झालाय का ते सांगा, त्याच्यामध्ये पुढील काळात नक्कीच सुधारणा करेन..
हे माझं इलेक्शन आहे. गावातील आपल्या कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून काम करावं..
कितीही दबाव आला, पैसा आला, देवेंद्र फडणवीस मतदारसंघात प्रचाराला आले तरी घाबरायचं नाही.. मतदारसंघात अमित शहा सुध्दा प्रचाराला येतील.. त्यांच्या प्रत्येक सभेनंतर, बैठकीनंतर आपलं 10 ते 15 हजाराने लीड वाढायला हवी याची दक्षता आपल्या सर्वांना घ्यायची आहे.
काही लोकांचे उगाच खडी क्रेशर बंद केले.. काही लोकांना उगचं अडचणीत आणलं.. खोटे कलम टाकले.. २५ दिवस वाट बघा.. तुमच्या सर्व अडचणी सोडवल्या जातील…
तुमच्या साठी काय पण कोणीही येऊ द्या.. कोणाबरोबर पण मी भिडायला तयार आहे. मी कोणाला घाबरत नाही..

















