• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Pune helicopter news

Helicopter Crash News Today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यास निघालेल्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, 2 पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू !

October 2, 2024
रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

October 29, 2024

Tanaji sawant Pune News : कपाटात ठेवलेली बंदूक खाली पडली आणि अनर्थ झाला, 13 वर्षाचा मुलगा झाला जखमी, तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

October 17, 2024
Miss India World 2024 : मध्य प्रदेशातील निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब

Miss India World 2024 : मध्य प्रदेशातील निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब

October 17, 2024
Rajshree Dhananjay Munde car accident at Sortapwadi on Pune Solapur highway

पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे राजश्री धनंजय मुंडे यांच्या कारचा अपघात 

October 17, 2024
Maharashtra Assembly Election 2024, BJP

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात भाजप राबवणार मध्य प्रदेश पॅटर्न ? 

October 17, 2024
Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme Ambia Bahar 2024-25,Farmers of the state should take maximum benefit of the scheme - Agriculture Minister Dhananjay Munde,

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 : राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा – कृषि मंत्री धनंजय मुंडे 

October 4, 2024

You can now play Bill Gates’ first PC game and run over donkeys on your iPhone, Apple Watch

August 22, 2024

Indonesia’s largest fleet of taxis teams up to beat ride-hailing apps

August 21, 2024

‘Idol’ contestant besieged by pro-Trump Twitter users because of his name

August 20, 2024

Everyone stop everything: Beyonce just announced that she’s pregnant with twins

August 19, 2024

Instagram is testing photo albums, because nothing is sacred anymore

August 18, 2024

7 February games you should get excited about

August 17, 2024
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
Hello India Marathi
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विधानसभा निवडणूक २०२४
  • क्राईम न्यूज
  • ॲग्रो इंडिया
  • लाईफ स्टाईल
  • बिजनेस इंडिया
  • सरकारी योजना
  • आणखी
    • माणसांच्या कहाण्या
    • विमा
    • व्हिडिओ
    • फोटो स्टोरी
    • वायरल
No Result
View All Result
Hello India Marathi
Home ताज्या बातम्या

Helicopter Crash News Today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यास निघालेल्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, 2 पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू !

by HELLO INDIA MARATHI
October 2, 2024
in ताज्या बातम्या
0
Pune helicopter news
498
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

helicopter crash news today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या राजकीय दौर्‍यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हेलिकॉप्टरला पुण्याजवळील बावधन परिसरात मोठा अपघात झाला. तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले हेलिकॉप्टर दरीत कोसळले. दाट धुक्यामुळे झालेल्या या अपघातात दोन पायलट सह तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टर बेचिराख झाले. त्यात प्रवास करणाऱ्या तिघांचे मृतदेह ओळखणे कठीण झाले होते.

Pune helicopter news

पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास धुके असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते आणि तिघांचाही मृत्यू झाला. या परिसरात एकमेक हेलिपॅड असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती तिथे येत असतात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.

ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल नावाच्या केंद्र सरकारच्या संस्थेच्या मधल्या डोंगराळ भागातील के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर काही अंतरावरच हेलिकॉप्टरचा अपघात झाला, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

या अपघातानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे तिन्ही मृतदेह गंभीररित्या जळाले. हेलिकॉप्टर सरकारी की खासगी हे अद्याप समजू शकलेले नाही. मृतांचीही ओळख पटू शकली नाही.

हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर (Helicopter Crash) इंजिनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता.हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला.

सुनील तटकरे यांनी मंगळवारीच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते. आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

ऑगस्टा 109 असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार दिले जाणार होते, अशीही माहिती आहे.

मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे

हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने पेट घेतला होता. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले होते. उड्डाण झाल्यानंतर हेलिकॉप्टर पाच मिनिटांतच कोसळले. प्रचंड धुके असल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती घटनास्थळावरील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्यामुळे आतमध्ये असणाऱ्या मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे गेली होती. हे मृतदेह आता ससून रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची ४० दिवसातील पुण्यातील दुसरी घटना आहे. याआधी २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते.हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी होते. या अपघातात पायलट जखमी झाला. उर्वरित तीन जणांना गंभीर दुखापत झाली नाही.

Tags: pune helicopter accidentpune helicopter accident latest newspune helicopter accident todaypune helicopter accident videopune helicopter accident न्यूजpune helicopter crashpune helicopter crash latest news todaypune helicopter crash livepune helicopter crash live newspune helicopter crash newspune helicopter crash news in marathipune helicopter crash todaypune helicopter crash today newspune helicopter crash videopune helicopter latest news todayपुणे हेलीकॉप्टर latest news todayपुणे हेलीकॉप्टर अपघातपुणे हेलीकॉप्टर अपघात आजपुणे हेलीकॉप्टर अपघात ताजी बातमीपुणे हेलीकॉप्टर अपघात बातमीपुणे हेलीकॉप्टर अपघात व्हिडीओपुणे हेलीकॉप्टर क्रैशपुणे हेलीकॉप्टर दुर्घटना
Share199Tweet125
HELLO INDIA MARATHI

HELLO INDIA MARATHI

  • Trending
  • Comments
  • Latest
Pune helicopter news

Helicopter Crash News Today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यास निघालेल्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, 2 पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू !

October 2, 2024
रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

October 29, 2024
Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme Ambia Bahar 2024-25,Farmers of the state should take maximum benefit of the scheme - Agriculture Minister Dhananjay Munde,

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 : राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा – कृषि मंत्री धनंजय मुंडे 

October 4, 2024
Pune helicopter news

Helicopter Crash News Today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यास निघालेल्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, 2 पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू !

0

You can now play Bill Gates’ first PC game and run over donkeys on your iPhone, Apple Watch

0

Indonesia’s largest fleet of taxis teams up to beat ride-hailing apps

0
रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

October 29, 2024

Tanaji sawant Pune News : कपाटात ठेवलेली बंदूक खाली पडली आणि अनर्थ झाला, 13 वर्षाचा मुलगा झाला जखमी, तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

October 17, 2024
Miss India World 2024 : मध्य प्रदेशातील निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब

Miss India World 2024 : मध्य प्रदेशातील निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब

October 17, 2024
Hello India Marathi

Copyright © 2024 Hello India Marathi.

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विधानसभा निवडणूक २०२४
  • क्राईम न्यूज
  • ॲग्रो इंडिया
  • लाईफ स्टाईल
  • बिजनेस इंडिया
  • सरकारी योजना
  • आणखी
    • माणसांच्या कहाण्या
    • विमा
    • व्हिडिओ
    • फोटो स्टोरी
    • वायरल

Copyright © 2024 Hello India Marathi.