Nikita Porwal Femina Miss India World 2024 : मध्यप्रदेशातील उज्जैन येथील निकीता पोरवाल या तरूणीने यंदाचा मिस इंडियाचा किताब पटकावला. रेखा पांडे (Rekha Pande) ही या स्पर्धेत उपविजेती ठरली. मिस इंडिया स्पर्धा मुंबईत पार पडली होती. 2024 च्या मिस इंडियाची घोषणा करण्यात आली.

यंदाची फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२४ ही स्पर्धा मुंबईत पार पडली. या स्पर्धेत निकीता पोरवाल हिने बाजी मारली. २०२३ ची मिस इंडिया नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) हिने निकीताच्या डोक्यावर विजेतेपदाचा क्राऊन चढवला.
निकीता पोरवाल ही मध्यप्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी आहे. पेट्रो केमिकल व्यावसायिक अशोक पोरवाल (Ashok Porwal) यांची ती मुलगी आहे. निकीता हिने बॅचलर ऑफ परफाॅर्मिंगची पदवी संपादन केली आहे. काॅलेजमध्ये तीला नाटकाची आवड निर्माण झाली. तेव्हापासून ती अभिनयाकडे जास्त आकर्षित झाली. अभिनयासोबतच तिला वाचन, लेखन, चित्रपट पाहणे व चित्रकला याचा छंद आहे.
तिने वयाच्या १८ व्या वर्षी टिव्ही अँकर म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली.तिने ६० पेक्षा अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे २५० पानी ‘कृष्ण लीला’ हे नाटक तीने लिहले आहे. याशिवाय एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात तिच्या एका चित्रपटाचे स्क्रीनिंग पार पडले आहे. लवकर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे.
निकीता पोरवाल ही सोशल मिडीयावर फारसी सक्रीय नसते. मिस इंडियाचा किताब जिंकण्याआधी Instagram वर फक्त ५ हजार फाॅलोवर्स होते. निकीताने अतिशय कमी वयात मिस इंडियाचा किताब जिंकून जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. तिचा हा यशाचा प्रवास तिच्या कुटुंबियांसाठी अभिमानास्पद ठरला आहे. निकीताने लहान वयात प्रचंड मेहनत घेत मिस इंडिया होण्याचा बहुमान मिळवला. तिचा हा प्रवास प्रेरणादायक आहे.

















