• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme Ambia Bahar 2024-25,Farmers of the state should take maximum benefit of the scheme - Agriculture Minister Dhananjay Munde,

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 : राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा – कृषि मंत्री धनंजय मुंडे 

October 4, 2024
रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

October 29, 2024

Tanaji sawant Pune News : कपाटात ठेवलेली बंदूक खाली पडली आणि अनर्थ झाला, 13 वर्षाचा मुलगा झाला जखमी, तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

October 17, 2024
Miss India World 2024 : मध्य प्रदेशातील निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब

Miss India World 2024 : मध्य प्रदेशातील निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब

October 17, 2024
Rajshree Dhananjay Munde car accident at Sortapwadi on Pune Solapur highway

पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे राजश्री धनंजय मुंडे यांच्या कारचा अपघात 

October 17, 2024
Maharashtra Assembly Election 2024, BJP

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात भाजप राबवणार मध्य प्रदेश पॅटर्न ? 

October 17, 2024
Pune helicopter news

Helicopter Crash News Today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यास निघालेल्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, 2 पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू !

October 2, 2024

You can now play Bill Gates’ first PC game and run over donkeys on your iPhone, Apple Watch

August 22, 2024

Indonesia’s largest fleet of taxis teams up to beat ride-hailing apps

August 21, 2024

‘Idol’ contestant besieged by pro-Trump Twitter users because of his name

August 20, 2024

Everyone stop everything: Beyonce just announced that she’s pregnant with twins

August 19, 2024

Instagram is testing photo albums, because nothing is sacred anymore

August 18, 2024

7 February games you should get excited about

August 17, 2024
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
Hello India Marathi
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विधानसभा निवडणूक २०२४
  • क्राईम न्यूज
  • ॲग्रो इंडिया
  • लाईफ स्टाईल
  • बिजनेस इंडिया
  • सरकारी योजना
  • आणखी
    • माणसांच्या कहाण्या
    • विमा
    • व्हिडिओ
    • फोटो स्टोरी
    • वायरल
No Result
View All Result
Hello India Marathi
Home ॲग्रो इंडिया

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 : राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा – कृषि मंत्री धनंजय मुंडे 

by HELLO INDIA MARATHI
October 4, 2024
in ॲग्रो इंडिया, विमा
0
Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme Ambia Bahar 2024-25,Farmers of the state should take maximum benefit of the scheme - Agriculture Minister Dhananjay Munde,
496
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई । हॅलो इंडिया मराठी । ४ ऑक्टोबर २०२४ : पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये सरकारने डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांचा समावेश केला आहे. ही योजना महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme Ambia Bahar 2024-25,Farmers of the state should take maximum benefit of the scheme - Agriculture Minister Dhananjay Munde,

या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे.

जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य आहे. या योजनेत राज्यात ‍प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हे) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) अशी मर्यादा राहील. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळूण जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.

फळपिकांचे खालील उत्पादनक्षम वय आवश्यक

  • आंबा, चिकू, काजू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 5 वर्षे,
  • लिंबू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 4 वर्षे,
  • संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 3 वर्षे,
  • डाळिंब, द्राक्ष फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 2 वर्षे,
  • केळी, पपई, स्ट्रॉबेरी पिकासाठी उत्पादनक्षम वय नाही.
  • त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपिक द्राक्ष पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख ८० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम १ लाख २७ हजार असून शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ असा आहे.

मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार आहे. केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. पपई पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम १३ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ असा आहे

संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार आहे. काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख २० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ४० हजार आहे. आंबा (कोकण) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ असा आहे.

आंबा (इतर जिल्हे) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२४ असा आहे.

स्ट्रॉबेरी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम दोन लाख ४० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ८० हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ असा आहे.डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ६० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५३ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२५ असा आहे. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता सर्वसाधारण पणे विमा संरक्षित रकमेच्या ५% असतो.मात्र कमी जिल्ह्यात तो जास्त असू शकतो .

आंबिया बहार सन 2024-25 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अवेळी पाऊस, कमी /जास्त तापमान, वेगाचे वारे, गारपीट इत्यादी निर्धारीत केलेले हवामान धोके (Weather Triggers)लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे.

योजनेत सहभाग करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट (Add on Cover) या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमीत व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. आंबिया बहारातील अधिसुचित योजनेच्या अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Tags: Farmers of the state should take maximum benefit of the scheme - Agriculture Minister Dhananjay MundeRestructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme Ambia Bahar 2024-25पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार 2024-25मंत्री धनंजय मुंडे
Share198Tweet124
HELLO INDIA MARATHI

HELLO INDIA MARATHI

  • Trending
  • Comments
  • Latest
Pune helicopter news

Helicopter Crash News Today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यास निघालेल्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, 2 पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू !

October 2, 2024
रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

October 29, 2024
Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme Ambia Bahar 2024-25,Farmers of the state should take maximum benefit of the scheme - Agriculture Minister Dhananjay Munde,

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 : राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा – कृषि मंत्री धनंजय मुंडे 

October 4, 2024
Pune helicopter news

Helicopter Crash News Today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यास निघालेल्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, 2 पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू !

0

You can now play Bill Gates’ first PC game and run over donkeys on your iPhone, Apple Watch

0

Indonesia’s largest fleet of taxis teams up to beat ride-hailing apps

0
रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

रोहित पवार गाड्या बदलत नाही तर हेलिकॉप्टर आणि विमान सुध्दा बदलतो, कर्जतमधील सभेत रोहित पवार काय म्हणाले ? वाचा A टू Z मुद्दे 

October 29, 2024

Tanaji sawant Pune News : कपाटात ठेवलेली बंदूक खाली पडली आणि अनर्थ झाला, 13 वर्षाचा मुलगा झाला जखमी, तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

October 17, 2024
Miss India World 2024 : मध्य प्रदेशातील निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब

Miss India World 2024 : मध्य प्रदेशातील निकीता पोरवालने जिंकला मिस इंडिया किताब

October 17, 2024
Hello India Marathi

Copyright © 2024 Hello India Marathi.

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विधानसभा निवडणूक २०२४
  • क्राईम न्यूज
  • ॲग्रो इंडिया
  • लाईफ स्टाईल
  • बिजनेस इंडिया
  • सरकारी योजना
  • आणखी
    • माणसांच्या कहाण्या
    • विमा
    • व्हिडिओ
    • फोटो स्टोरी
    • वायरल

Copyright © 2024 Hello India Marathi.